[ecis2016.org] मुंबई आणि पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले लोणावळा लोकप्रिय विकएंड धमालीचे ठिकाण मानले जाते. या लोणावळ्यातील १० सर्वोत्तम पर्यटन स्थळे आणि चुकवू नये असे काही
लोणावळा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण असून भेट देण्याजोगी अनेक पर्यटन ठिकाणे – नयनरम्य धबधबे, मनमोहक तलाव, किल्ले आणि त्याहून बरंच काही आहे. या लेखात, आम्ही लोणावळ्यातील सर्वोत्तम जागा आणि न चुकवाव्या अशा काही गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत.
You are reading: लोणावळ्यातील १० सर्वोत्तम पर्यटन स्थळे आणि चुकवू नये असे काही
या थंड हवेच्या पर्यटन स्थळाला बऱ्याचदा ‘सह्याद्रीचे रत्न’ म्हटले जाते, या ठिकाणाची बहीण म्हणजे खंडाळा, हनिमून जोडपी, कुटुंबे आणि मित्र परिवारासह साहसवीरांना आकर्षित करते.
हे देखील पहा: सर्वोच्च १५ भेट देण्याजोगी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे
लोणावळ्यातील सर्वोत्तम पर्यटन स्थळे #१: टायगर्स लीप
लोणावळ्यातील टायगर पॉइंट किंवा टायगर लीप हे ६५० मीटर डोंगर शिखरावर वसलेले, हिरवीगार दरी, तलाव आणि धबधब्यांच्या विहंगम दृश्याचा नजराणा लाभलेले ठिकाण. टायगर पॉइंट हे पर्यटकांनी नक्की भेट द्यावे असे लोणावळ्यातील ठिकाण! ढगांच्या दुलईत सामावलेले, प्रामुख्याने मान्सूनमध्ये हिरवेकंच सौंदर्य लाभलेले निसर्गरम्य स्थळ. स्थानिकांमध्ये ही जागा वाघदरी म्हणून प्रसिद्ध आहे. तिचा आकार झेपावणाऱ्या वाघासारखा असल्याने हे नाव पडले असावे. इथला सूर्योदय आणि सूर्यास्त मनोहारी असतो. पर्यटन स्थळाजवळ लहानसा धबधबा असून तो पावसाळ्यात वहातो. इथल्या धबधब्यांचा आणि चित्तवेधक दऱ्यांचा वेध घेण्यासाठी नजरेचे पारणे फेडणाऱ्या या टायगर लीपला लोणावळ्यातील मुक्कामात नक्कीच भेट दिली पाहिजे.
लोणावळ्यातील सर्वोत्तम पर्यटन स्थळे #२: कार्ला लेणी आणि भाजा लेणी
इतिहासप्रेमींसाठी लोणावळ्यात भेट देण्याजोगी ठिकाणे म्हणजे कार्ला आणि भाजा लेणी! या बौद्धकालीन शैलीतील दगडी गुंफा इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील आहेत. त्या परस्परांपासून ८ किमी अंतरावर वसलेल्या आहेत. कार्ला लेणी ही सर्वात प्रभावी एकल गुंफा आहे आणि भारताच्या पूर्वार्धातील चैत्य असून तिच्या शेवटाला स्तूप देखील आहे. कार्ला लेणी हे भारतामधील सर्वात मोठे हिनायन बौद्ध चैत्य (मंदिर) आहे, ज्याची उभारणी सातवाहनाच्या राजवटीत करण्यात आली. या वास्तूचे २००० वर्षे जुन्या लाकडी तुळया अजूनही शाबूत आहेत. कार्ला लेणीचे चढण साधारण २० मिनिटांत पार होते. तीन हत्तींच्या भव्य कोरीवकाम असलेल्या सिंहासनावर बसलेले उपदेशक बुद्धाचे शिल्प आहे. भाजा गावापासून ४०० फूट उंचीवर वसलेली भाजा लेणी ही २२ दगडांत कोरलेल्या लेण्यांमधली एक वास्तुशिल्पीय चमत्कार आहे. या लेण्यांमध्ये एकहून अधिक स्तूप असल्याने त्या अभिनव ठरतात. त्यांचे आरेखन हे साधारण कार्ल्याच्या चैत्य गृहासारखेच आहे, ज्याचे प्रवेशद्वार घोड्याच्या नालीसारखे असून भगवान बुद्धाच्या प्रतिमा आणि शिल्प आहेत. एका भिंतींत तबला वाजवणारी महिला कोरलेली असून भारतात २००० वर्षांपूर्वी वाद्यांच्या वापरांकडे अंगुलीनिर्देश होतो. या दगडांत कोरण्यात आलेल्या लेण्या, सोबत विहार, स्तूप आणि चैत्यांचा वापर वाटसरू आश्रय घेण्यासाठी होत असे.
लोणावळ्यातील सर्वोत्तम पर्यटन स्थळे #३: भुशी डॅम
भुशी डॅम हा धरण परिसर लोणावळ्यात भटकंती दरम्यान सर्वाधिक लोकप्रिय आणि विहंगम पर्यटन स्थळांपैकी एक असून सुंदर धबधबा हाकेच्या अंतरावरून वहातो. डोंगरराजीने वेढलेला, वाहत्या पाण्याचे धरण म्हणजे मोठाले निसर्ग जल उद्यानच आहे, इथे आल्यावर पर्यटकांचा थकवा पळून जातो. भुशी डॅमचे पाणी पायऱ्यांवरून वाहत खडकाळ परदेशातून मार्गक्रमण करत पाहणाऱ्याचे मन वेधून घेते. किलबिलाट करणारे पक्षी, हिरवाकंच निसर्ग आणि आल्हाददायी जलप्रपाताची भुरळ पर्यटकांना पडते. इंद्रायणी नदी तीरावर बांधण्यात आलेला भुशी डॅम लोणावळा आणि आयएनएस शिवाजीच्या डोंगराळ प्रदेशाच्या मागे उभा आहे. हे धरण मनोवेधक निसर्ग आणि डोंगराळ प्रदेशाने नटलेला आहे. इथे जलक्रीडा करण्यास मनाई आहे.
हे देखील पहा: मुंबईतील पर्यटन स्थळे आणि पाहण्यासारखी ठिकाणे
लोणावळ्यात भेट देण्याजोगी ठिकाणे #४: ड्यूक्स नोज
Read also : मुन्नारमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे पहा
लोणावळ्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे ड्यूक्स नोज. ड्यूक्स नोज पॉइंटवरून खंडाळा घाटाचा काळजाचा ठेका चुकवणारा नजारा पाहायला मिळतो. ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या नावावरून या जागेचे नाव पडले आहे. ड्यूक्स नोजला स्थानिक भाषेत नागफणी म्हणजे नागाचा फणा असे म्हणतात. ड्यूक्स नोज हे नयनरम्य ठिकाण, शांत वातावरण, सुंदर दऱ्या आणि हिरव्यागार वनराईसाठी प्रसिद्ध आहे. इथे शिखरावर असलेले शिव मंदिर प्रार्थनेचे आदर्श स्थळ मानण्यात येते. इथून सौंदर्याची मजा अनुभवता येते. लोणावळ्यातील हे लोकप्रिय ठिकाण गर्द वनातून जाणाऱ्या दगडाळ प्रदेश आणि अरुंद वाटांमुळे ट्रेकिंग, हायकिंग आणि रॉक क्लायबिंगसाठी लोकप्रिय आहे.
लोणावळ्यात भेट देण्याजोगी ठिकाणे #५: पवना सरोवर
पवना सरोवर हा कृत्रिम जलाशय असून लोणावळ्यात कॅम्पिंगकरिता पर्यटकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे पर्यटक निसर्ग आणि आल्हाददायक हवामान इत्यादीची मजा लुटू शकतात. पवना सरोवरानजीक अनेक किल्ले असून त्यात लोहगड किल्ला, तिकोना किल्ला आणि विसापूर किल्याचा समावेश होतो. या ठिकाणी नयनरम्य भटकंतीशिवाय, पर्यटकांना कॅनोइंग आणि नौकाविहाराचा पर्याय उपलब्ध आहे. पवना परिसराला भेट देण्यासाठी पावसाळी ऋतू अगदी योग्य असून सगळीकडे हिरवाईचा आनंद लुटता येतो. इथे कॅम्पिंगला सर्वाधिक पसंती देण्यात येते. काही टूर ऑपरेटर पवना सरोवराजवळ कॅम्पिंग पॅकेजही उपलब्ध करून देतात. इथला शांत भोवताल आणि सूर्यास्ताचे देखणे दृश्य जागेला खास बनवते.
हे देखील पहा: १० सुप्रसिद्ध ऐतिहासिक जागा- भारत
लोणावळ्यातील भटकंतीची ठिकाणे #६: राजमाची किल्ला
राजमाजी किल्ला हा लोणावळ्यात पर्यटकांचे सर्वोच्च पसंतीचे ठिकाण मानले जाते. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 2,710 फूट उंचीवर असून इथून सह्याद्री पर्वत तसेच शिरोटा धरण खाडीचा नयनरम्य नजारा दिसतो. राजमाची किल्ला हा शिवाजी महाराज, सम्राट औरंगजेब, शाहू महाराज आणि ब्रिटीश राजवटीचा साक्षीदार आहे. या किल्ल्यावर श्रीवर्धन आणि मनरंजन असे दोन बालेकिल्ले असून त्यावरून सभोवताली नजर फिरवणे शक्य आहे. हे पॉइंट आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदू आहेत. या किल्ल्यावर अनेक प्राचीन गुंफा आणि देवालये आहेत. जसे की काळ भैरव मंदिर, त्यापैकी काही किल्ला बांधणीच्या पूर्वीपासून अस्तित्वात होते. या जागेवरून हिरवागार मन शांत करणाऱ्या दृश्यांचे दर्शन होते आणि प्रामुख्याने निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे. राजमाची ट्रेक लोणावळा आणि कर्जत दरम्यान वसलेला आहे. लोणावळ्यापासून या ट्रेकचे अंतर दमाने चालल्यास १५ किमी (अंदाजे) आहे तर कर्जतपासून काहीशी ५ किमीची चढण लागते. कर्जतचा मार्ग वनातून जातो, काहीसा तीव्र चढणीचा असून उधेवाडी गावातून मार्गस्थ होतो.
हे देखील पहा: सर्वोच्च पर्यटन ठिकाणे – पुणे आणि पाहण्यासारखे बरेच काही
लोणावळ्यातील भटकंतीची ठिकाणे #७: नारायणी धाम मंदिर
लोणावळ्यात मध्यवर्ती ठिकाणी वसलेले नारायणी धाम मंदिर हे सर्वात लोकप्रिय पर्यटन ठिकाण आहे. हे मनोहारी शुभ्र मार्बल मंदिर 2002 मध्ये उभरण्यात आले होते. मा नारायणी हे या देवालयाचे मुख्य दैवत असून गणपती, हनुमान आणि अन्य हिंदू देवांचे स्थान मानले जाते. या मंदिराचे प्रवेशद्वार चार मजली असून मुख्य प्रवेशापासून देवळापर्यंतच्या मार्गावर कारंजे लावले आहेत. हे चित्तवेधक देवालय 4.5 एकरहून विस्तृत परिसरात उभे आहे. सोबतच सुंदर आणि उत्तम देखभाल लाभलेली बाग आहे.
लोणावळ्यातील पर्यटन ठिकाणे #८: सुनील यांचे सेलेब्रिटी वॅक्स म्युझियम
सुनील यांचे सेलेब्रिटी वॅक्स म्युझियम हे लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण ठरते. या संग्रहालयात १०० जिवंत वाटतील असे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटींचे पुतळे आहेत. हे वॅक्स म्युझियम टोल प्लाझाजवळील वरसोली रेल्वे स्थानकापासून अवघ्या ३ किमी अंतरावर आहे. सुनील यांचे सेलेब्रिटी वॅक्स म्युझियम यांचे नाव मेणाच्या शिल्पात तज्ज्ञ असलेल्या सुनील कंडलूर यांच्या नावावरून पडले. इथे सामाजिक सेवा, इतिहास, कला, साहित्य आणि पॉप संगीतासारख्या क्षेत्रातील लोकांची मेण शिल्प साकारण्यात आली आहेत. या पुतळ्यांमध्ये स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, बीआर आंबेडकर, कपिल देव, चार्ली चाप्लिन, नरेंद्र मोदी, सद्दाम हुसेन, छत्रपती शिवाजी आणि शिर्डी साई बाबांचा समावेश आहे.
लोणावळ्यातील पर्यटन ठिकाणे #९: कुणे धबधबा
कुणे धबधबा म्हणजे लोणावळ्यात भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी निसर्गाच्या सौंदर्याचे सर्वात भव्य रूप. हा धबधबा सह्याद्री पर्वतांच्या कुशीत ६२२ मीटर उंचीवर वसलेला आहे. त्रिस्तरीय धबधबा प्रकारात मोडणाऱ्या या धबधब्याची उंची २०० मीटर आहे. सभोवताली हिरवेगर्द जंगल निसर्गाच्या छायेत थक्क करणारा अनुभव देते. पावसाळ्यात कुणे धबधब्याकडे पर्यटकांची मोठी गर्दी होते. यावेळी धबधब्यातून वेगाने होणारा जलप्रपात परमोच्च शिखरावर असतो. गार पाण्यात बुडी मारण्यासोबतच तुम्हाला जीवलगांसोबत सहलीचा आनंद लुटता येतो. शिवाय इथे झिपलायनिंग आणि रॅपलिंगसारख्या साहसी क्रिडाप्रकारांची मजा घेता येते.
लोणावळ्यातील पर्यटन ठिकाणे #१०: तुंगार्ली तलाव
तुंगार्ली तलाव हे पर्यटकांनी आराम करण्याचे आणि निसर्गाचा आनंद घेण्याचे ठिकाण आहे. या तलावातील पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणजे १९३० साली बांधण्यात आलेले तुंगार्ली धरण आहे. हा आसपासच्या डोंगराळ परिसराच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत मानला जातो. एक विकएंड स्पॉट म्हणून तुंगार्ली धरण प्रसिद्ध आहे. या तलाव परिसरातून राजमाची आणि लोहगड किल्ल्याचे विहंगम दृश्य नजरेत साठवता येते. या ठिकाणापासून जवळच अनेक रिसॉर्ट, असून पर्यटकांना भुरळ पाडणारा पिकनिक स्पॉट एक दिवसीय भटकंतीसाठी उत्तम आहे. पावसाळ्यातील सहलीसाठी आदर्श असणारे हे पर्यटन स्थळ श्वास रोखून ठेवणारा जलाशय परिसर आणि फिरण्यासाठी बाग मोक्याचे ठिकाण आहे. ज्यांना ट्रेकिंग आणि कॅम्पिंगची आवड आहे, त्यांनी तुंगार्लीला नक्की यावे.
हे देखील पहा: सर्वोच्च १० पर्यटन स्थळे – भारत
लोणावळ्यात येऊन चुकवू नये असे काही
Read also : वारसा हक्क कायदा: वारस कोण आहे आणि वारसा काय आहे?
तुम्ही लोणावळ्यात अनेक प्रकारे भटकंती करू शकता. निसर्गप्रेमींसाठी हा खजिनाच आहे. इथे बोटींग, कॅम्पिंग, साहसी क्रिडाप्रकार आणि ट्रेकिंग मार्गांचे अनेक पर्याय आहेत.
ट्रेकिंग
लोणावळा हे आल्हाददायक थंड हवेचे ठिकाण साहसवीरांच्या पसंतीचे आहे. भीमा शंकर ट्रेक आणि लोहगड किल्ला ट्रेक हे लोणावळ्यातील दोन सर्वाधिक लोकप्रिय आणि सुंदर ट्रेक आहेत. सभोवताली कुरणं, दऱ्या आणि डोंगरराजी आहेत. लोहगड किल्ला हा समुद्र सपाटीपासून १,०३३ मीटर उंचीवर असून रात्रीच्या ट्रेकसाठी प्रथम पसंतीचा आहे. तुम्ही राजमाची ट्रेकची योजनाही आखू शकता, नवख्या आणि निष्णात ट्रेकर्स, दोघांसाठी हा ट्रेक आदर्श आहे. नवख्या ट्रेकरला राजमाची गावात पोहचून अर्ध्या तासाचा किल्ल्यापर्यंतचा ट्रेक पूर्ण करता येईल. तर निष्णात ट्रेकर कर्जतकडून सुरू करून ३-४ तासांत शिखरावर पोहचून ट्रेक पूर्ण करू शकतो, हे शिखर समुद्र सपाटीपासून सुमारे २,००० फूट उंचीवर आहे. तिकोना किल्ल्याला त्रिकोणी किल्ला देखील संबोधले जाते. तो साहसी सफर आणि रम्य दृश्यांसाठी ओळखला जातो. इथे येणाऱ्यांना पवना धरण, तुंग किल्ला, लोहगड किल्ला आणि विसापूर किल्ल्याचे मनोहारी दृश्य टिपता येते.
डेला अॅडव्हेंचर पार्क येथे राइड
स्रोत: Pinterest
डेला अॅडव्हेंचर पार्क हे सर्वात लोकप्रिय साहस उदयान लोणावळ्यात आहे. एका भव्य दरीने वेढलेले हे अॅडव्हेंचर पार्क आणि रिसॉर्टमध्ये, पर्यटक धनुर्विद्या, रॉकेट इजेक्टर, स्वूप स्विंग (सुमारे 100 फूट उंच), झोर्बिंग, फ्लाइंग फॉक्स, मोटोक्रॉस, डर्ट बाइक रायडिंग, बग्गी राइड, पेंटबॉल आणि रॅपलिंगची मजा लुटायला येतात.
लोणावळ्यातील खरेदी
लोणावळ्यात खरेदी म्हटली की त्यात चिक्की आणि गोड पदार्थ विकत घेतलेच पाहिजेत. तोंडात टाकल्यावर विरघळणाऱ्या पारंपरिक पद्धतीच्या, गूळ-साखरेच्या पाकाच्या चिक्क्या म्हणजे लोणावळ्याची शान आहे. लोणावळ्यात प्रत्येक कोपऱ्यावर चिक्कीचे दुकान आहे. इथे चिक्कीचे हरखून टाकणारे प्रकार मिळतात. शेंगदाणा चिक्कीपासून गुलाबाच्या पाकळ्या, तीळ, काजू, राजगिरा, चॉकलेट, खोबऱ्याच्या चिक्क्या विकण्यासाठी उपलब्ध असतात. कूपर हे लोणावळ्यातील सर्वात जुने चिक्की आणि गोड पदार्थांचे दुकान आहे. लोणावळ्यात मगनलाल हे चिक्की खरेदीसाठी प्रसिद्ध असलेले आणखी एक नाव! त्यांचे चॉकलेट फज अतिशय लोकप्रिय आहे. शिवाय, जाम, जेली आणि सीरपची खरेदीही इथे करता येते. लोणावळ्याचा बाजार रंगीत हस्तकलेच्या वस्तू, लाकडी मूर्ती, सजावटीच्या वस्तू, ऊस उत्पादने, मिठाया आणि कोल्हापुरी चपलांसाठी प्रसिद्ध आहे.
हे देखील पहा: जगातील १५ सर्वोत्तम पर्यटन स्थळे
लोणावळ्यात हे पदार्थ नक्की चाखावे
लज्जतदार चिक्की आणि चॉकलेट फजसोबत लोणावळ्यात खाबूगिरीचे अनेक पर्याय आहेत. पर्यटकांना इथले ढाबे, रेस्टॉरंट आणि रस्त्यावरच्या ठेल्यांवर खादडी करता येते. इथे चायनीज, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पदार्थ सहज उपलब्ध होतात. तसेच गुजराती आणि महाराष्ट्रीय थाळ्या प्रसिद्ध आहेत. इथे मिळणाऱ्या गरम- तिखट वडा-पावसोबत भाजके मक्याचे कणीस, डाळी आणि कडधान्य तिखट तरीत सोडून तयार केलेली महाराष्ट्रीय उसळ आणि पाव, मका व कांद्याच्या भज्यांची चव चाखलीच पाहिजे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
लोणावळ्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
लोणावळ्यात वर्षभर आल्हाददायक वातावरण असते. तरीच इथे पावसाळ्यात (जुलै ते सप्टेंबर) दरम्यान हिरवाई आणि धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी नक्की या. इथे तापमान २१-२३ अंश असते.
लोणावळ्यानजीक भेट देण्याजोगी सर्वोत्तम ठिकाणे कोणती?
कर्नाळा पक्षी अभयारण्य प्रसिद्ध असून इथे पक्ष्यांच्या १५० हून अधिक प्रजाती पाहायला मिळतात. इथला पुरातन किल्ला देवगिरीचे यादव आणि तुघलकांच्या कालखंडात ख्रिस्तपूर्व १४०० मध्ये बांधण्यात आला. लोणावळ्यापासून कामशेत १७ किमी असून हे सह्याद्री पर्वतांचे सर्वोच्च पठार आहे. हे ठिकाण पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध आहे. जवळच भेट देता येईल अशी अॅम्बी व्हॅली सिटी आहे. हे ठिकाण लोणावळ्यापासून २५ किमी अंतरावरील स्वतंत्रपणे नियोजन केलेले थंड हवेचे ठिकाण तलाव, आलिशान बंगले, साहसी पर्याय आणि १८ होल गोल्फ कोर्ससाठी लोकप्रिय आहे.
लोणावळ्याला भेट देण्यासाठी किती दिवस पुरेसे आहेत?
लोणावळ्यातील सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी, इथले नयनरम्य पॉइंट, प्राचीन किल्ले, मंत्रमुग्ध करणारे धबधबे आणि तलाव पाहण्यासाठी दोन दिवस पुरेसे आहेत.
Source: https://ecis2016.org/.
Copyright belongs to: ecis2016.org
Source: https://ecis2016.org
Category: Marathi