[ecis2016.org] जेव्हा घरातील मंदिर किंवा प्रार्थना करणाऱ्या क्षेत्राचा विचार केला जातो, तेव्हा घरातील रहिवाशांसाठी जास्तीत जास्त सकारात्मक भाव सुनिश्चित करण्यासाठी अनेक वास्तुशास्त्र मार्गदर्शक तत्त्वे पाळली पाहिजेत. घरातील मंदिराच्या दिशेचे वास्तू नियम पहा आणि घरातील पूजा खोलीत देवांच्या मूर्ती कोणत्या दिशेला असाव्यात हे जाणून घ्या.
घरातील टेम्पल, ज्याला भारतात मंदिर असेही म्हणतात, हे एक पवित्र स्थान आहे जिथे आपण देवाची पूजा करतो. स्वाभाविकच, पूजा कक्ष वास्तू सकारात्मक ऊर्जा आणेल आणि जागा शांततामय करेल. वास्तुशास्त्रानुसार स्थापिलेले मंदिर, त्या घरातील रहिवाशांचे आरोग्य, समृद्धी व आनंद आणू शकते.
You are reading: वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिराची दिशा: पूजा खोलीत देवाचे मुख कोणत्या दिशेला असावे हे जाणून घ्या
घरामध्ये मंदिर किंवा मंदिर ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे ईशान्य दिशा किंवा ईशान कोना, जी वास्तुशास्त्रानुसार शुभ मानली जाते.
स्वतंत्र पूजा कक्ष असणे आदर्शवत आहे, परंतु महानगरात, जेथे जागा कमी आहे तेथे हे नेहमीच शक्य नसते. अशा घरांसाठी आपण आपल्या आवश्यकतेनुसार भिंतीमध्ये उभारलेले मंदिर किंवा घरामधिल एखाद्या लहान कोपऱ्याचा मंदिरासाठी विचार करू शकता.
मंदिर असलेला परिसर, हा दिव्य शक्तीने भारलेला शांतीचा एक परिपूर्ण भाग असावा, असे मुंबई-वास्तुप्लसचे श्री. नितीन परमार म्हणतात. “सर्वशक्तिमान देवाला शरण जाऊन आपण शक्ती प्राप्त करतो अशी ही एक जागा आहे. एखाद्याला मंदिरासाठी संपूर्ण खोली देण्यासाठी जागा नसल्यास, घराच्या उत्तर-पूर्व क्षेत्राच्या दिशेने पूर्वेकडील भिंतीवर एक छोटी वेदी बसविली जाऊ शकते. दक्षिण, दक्षिण-पश्चिम किंवा दक्षिण-पूर्वेकडील घराच्या जागेत मंदिर उभारण्याचे टाळा,” असे श्री परमार पुढे सांगतात.
पूर्व ही उगवत्या सूर्याची आणि भगवान इंद्राची दिशा आहे म्हणून पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना केल्याने सौभाग्य आणि वृद्धी होते. पश्चिमेकडे तोंड करून प्रार्थना केल्याने संपत्ती आकर्षित होण्यास मदत होते. उत्तरेकडे तोंड केल्याने योग्य संधी आणि सकारात्मकता आकर्षित करण्यास मदत करते. वास्तूनुसार मंदिराच्या दिशेनुसार, प्रार्थना करताना दक्षिणेकडे तोंड न करणे चांगले. त्यामुळे घरातील मंदिराच्या मुखाची दिशा दक्षिणेशिवाय काहीही असू शकते.
हे देखील पहा: घर खरेदी करताना आपण दुर्लक्ष करू नये असे वास्तू दोष
घरातील मंदिराची दिशा: घरातील मंदिरासाठी वास्तु टिप्स
पूजागृहात देवाचे मुख कोणत्या दिशेला असावे? मूर्ती ठेवण्यासाठी टिपा
पूजा कक्ष वास्तूनुसार देवतांचे मुख हार आणि फुलांनी झाकले जाऊ नये. देवाची भक्कम मूर्ती नेहमी ठेवावी आणि मंदिरात पोकळ मूर्ती ठेवू नये. पण, पूजागृहात देवाचे मुख कोणत्या दिशेला असावे? काही स्पष्ट केले आहेत. गणपतीला लक्ष्मीच्या डाव्या बाजूला आणि देवी सरस्वती देवी लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवावी. शिवलिंग (फक्त लहान आकाराचे, वास्तू म्हणतात) घराच्या उत्तरेकडील भागात ठेवावे. हनुमानाची मूर्ती नेहमी दक्षिण दिशेला असावी. ज्या देवतांच्या मूर्ती उत्तर दिशेला ठेवाव्या लागतात, दक्षिण दिशेला तोंड करून ठेवाव्या लागतात त्या गणेश, दुर्गा आणि कुबेर आहेत. सूर्य, ब्रह्मा, विष्णू, महेश यांना पूर्वेकडे पश्चिमेकडे तोंड करून ठेवावे.
म्हणून, पूजा खोलीची रचना करताना मंदिरातील देव घरामध्ये योग्य दिशेला आहेत की नाही हे तपासणे आवश्यक आहे.
हे देखील पहा: दक्षिण पश्चिम विस्तारित प्लॉट वास्तुबद्दल जाणून घ्या
वास्तूनुसार मंदिराची दिशा: छोट्या फ्लॅटमधील पूजा मंदिरासाठी डिझाइन कल्पना
मंदिराच्या गोपुराप्रमाणे दिसणारे पिरॅमिड रचनेचे छत, आपल्या पूजाकक्षाच्या छतासाठी एक चांगली रचना आहे. पिरॅमिड आकार सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी ओळखला जातो.
आजकाल, लोक अपार्टमेंटमध्ये राहतात आणि अनेकदा समर्पित पूजा कक्ष असणे कठीण झाले आहे. तथापि, शांत पूजा कक्ष तयार करण्याचे अनेक मनोरंजक मार्ग आहेत. फ्लॅटमधील पूजा रुमसाठी तुम्ही वास्तूचे नियम पाळत असल्याची खात्री करा.
हे देखील पहा: घरातून नकारात्मकता कशी दूर करावी
मनोरंजन/लिव्हिंग रूममध्ये पूजा खोली
लहान अपार्टमेंटसाठी, पूजा युनिट ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा लिव्हिंग रूममध्ये आहे. जर तुमच्याकडे करमणूक युनिटमध्ये रिकाम्या शेल्फ्स असतील, तर तुम्ही समर्पित पूजेच्या जागेसाठी एक छोटा कोपरा सजवू शकता. तथापि, ज्यांना ध्यान आणि प्रार्थना करण्यात बराच वेळ घालवायला आवडतो त्यांच्यासाठी गोपनीयता आणि एकाग्रता याची समस्या राहील. पूर्वाभिमुख घरासाठी वास्तुनुसार पूजा कक्ष नेहमी उत्तर-पूर्व दिशेला असावा.
किचन कॅबिनेटमध्ये पूजा कक्ष
वास्तूचे नियम पाळत असताना, फ्लॅटमधील पूजा खोलीची रचना करण्यासाठी स्वयंपाकघराचा विचार करणे हा एक पर्याय आहे, जर इतर जागा उपलब्ध नसतील. तुम्ही भिंतीवर लावण्याजोगी पूजा खोली तयार करू शकता. स्वयंपाकघरातील फडताळ तुम्ही लहान मंदिरासारखे काम करण्यासाठी अनुकूल करू शकता. ज्या भिंतीवर मंदिर उभारण्याचे निश्चित केले जात आहे त्या भिंतीवर सजावटीच्या टाइल्स वापरा किंवा एक लहान कमान बनवा आणि नंतर मंदिर अधोरेखित करण्यासाठी बसवून घ्या. पूजा मंदिराच्या दाराला तासलेल्या कडा आणि जेव्हा दिवा आणि उदबत्ती लावली जाते तेव्हा धूर पसरण्यासाठी दाराला सुरेख छिद्रे करू शकतात. स्वयंपाकघरातील मंदिर स्टोव्हच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवा. मंदिरासमोर स्टोव्ह ठेवणे टाळा आणि गॅस स्टोव्ह किंवा किचन सिंकच्या वर मंदिर कधीही ठेवू नका कारण ते दुर्दैव आणू शकते.
जेवणाच्या खोलीचा कोपरा
आपण जेवणाच्या खोलीच्या रिकाम्या कोपऱ्याला पूजेच्या जागेत रूपांतरित करू शकता जेथे मूर्ती जमिनीच्या पातळीपासून कित्येक इंच उंचीवर असतील. तुम्ही हा प्रदेश उजळवण्यासाठी मूर्तींच्या वर किंवा खाली लहान दिवे लावू शकता आणि पूजेच्या आवश्यक वस्तू देखील साठवू शकता. तसेच गोपनीयतेसाठी आणि सार्वजनिक नजरेपासून दूर ठेवण्यासाठी पूजेच्या जागेला एक लहान पडदा देखील लावू शकता.
पूजा खोलीसाठी खोली विभाजक वापरा
जर घराचे मंदिर लिव्हिंग रूम, जेवणाच्या भागात, शयनकक्ष किंवा अभ्यासिकेमध्ये वास्तूने सुचवलेल्या दिशेनुसार गृहमंदिर लावले असल्यास, खोली विभाजक वापरूण पूजेसाठी एक वेगळी जागा तयार करणे चांगले. एक साधा पडदा, काचेची भिंत, सजवलेले प्लास्टर ऑफ पॅरिसचे विभाजक किंवा उभ्या गार्डन रूम डिव्हायडर वापरता येतात. पूजेचे सामान ठेवण्यासाठी शेल्फसह एक लहान लाकडी दुभाजक देखील वापरता येतो. आनंददायी प्रभावासाठी, धार्मिक चिन्हे, कोरीव काम किंवा पडद्यावरील स्टॅन्सिल कटसह त्याची रचना करा.
उघडे शेल्फ कोपरे
तुमच्याकडे खुल्या शेल्फ असल्यास, तुम्ही मूर्ती ठेवण्यासाठी छोट्या पूजा जागेची व्यवस्था सहज करू शकता. छोट्या घरांसाठी, घराच्या एका कोपऱ्यात बांधलेल्या धातूच्या शेल्फ् ‘चे एक आधुनिक पूजा जागा बनवतात ज्यामध्ये प्रत्येक शेल्फवर वेगवेगळ्या मूर्ती असतात आणि दिवे आणि उदबत्तीसाठीही जागा असते.
- पॅन कार्डवरील फोटो आणि सही कशी बदलावी?
- आधार कार्ड पडताळणी ऑनलाइन प्रक्रिया: आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट
- कोईम्बतूरमध्ये भेट देण्यासाठी 13 सर्वोत्तम ठिकाणे
- महाभूलेख ७/१२ ऑनलाइन: महाराष्ट्राच्या ७/१२ उतारा जमिनीच्या नोंदीबद्दल तुम्हाला माहित असले पाहिजे असे सर्वकाही
- पश्चिम गुजरात विज कंपनी लिमिटेड (PGVCL): ऑनलाइन बिले भरा
भिंतीतील कोनाडा
एका छोट्या घरात मंदिरासाठी भिंतीवर एक लहान कोनाडा किंवा जागा तयार करा. आल्हाददायक सुखकारक रंगांमध्ये हा कोनाडा सजवा आणि आनंददायक फोकस लाइटचा मंदिरावर वापर करा.
हे देखील पहा: घरात गणपती ठेवण्यासाठी वास्तू टिपा
घरात मंदिराची दिशा: मंदिराचे तोंड कोणत्या दिशेला करावे?
घराच्या टेम्पलची किंवा मंदिराची रचना करताना, मंदिराचे तोंड वास्तुशास्त्रात नमूद केलेल्या दिशेकडे असल्याची खात्री करा.
गुरु हा ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेचा स्वामी आहे, ज्याला ‘ईशान कोना’ म्हणून संबोधले जाते, असे वास्तु शास्त्र आणि ज्योतिष तज्ञ सौ. जयश्री धामणी सांगतात. “ईशान हा ईश्वर किंवा देव आहे. व याप्रकारे ती देवाची / गुरुची दिशा आहे. म्हणून, तेथे मंदिर उभारण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय, पृथ्वीचा कल फक्त ईशान्य दिशेकडे आहे आणि ती उत्तर-पूर्वेच्या सुरूवातीच्या बिंदूसह सरकते. म्हणूनच, हा कोपरा रेल्वेच्या इंजिनसारखा आहे, जो संपूर्ण रेल्वे खेचतो. घराच्या या भागात मंदिराचे स्थानदेखील असेच आहे – यामुळे संपूर्ण घरासाठीची उर्जा ती आपल्या दिशेने ओढते आणि नंतर पुढे घरभर पसरवते,” असेही सौ. धामणी म्हणतात. घराच्या मध्यभागी ठेवलेले एक मंदिर – ज्याला ब्रह्मस्थान म्हणून संबोधले जाते हा देखील एक शुभ भाग आहे असे म्हणतात आणि यामुळे तेथे राहणाऱ्यांना समृद्धी व चांगले आरोग्य मिळते, असे धामणी पुढे म्हणतात.
हे देखील पहा: भारतीय घरांसाठी पूजा कक्षाचे सोपे/साधे डिझाइन
घरात आपला पूजा कक्ष उभारण्यासाठी असलेली उत्तम दिशा
आपल्या पूजा कक्षातील वास्तू दोषावर सोपे उपाय
- देवाच्या मुर्त्या एकमेकांकसे तोंड करून नाहीत याची खात्री करुन घ्या.
- मुर्त्या उभ्या ठेवा – यासाठी एक साधा पाट देखिल वापरता येईल.
- भिंतीपासून मूर्ती किमान एक इंच अंतरावर ठेवा.
- दिवे आणि समाई दक्षिण-पूर्वेस ठेवले पाहिजेत.
- खराब झालेल्या मूर्ती कधीही ठेवू नका.
- पूजा कक्षात नेहमी गोंधळमुक्त वातावरण ठेवा.
हे देखील पहा: संरचनात्मक बदल न करता घराची वास्तू कशी सुधारता येईल?
पूजा कक्ष वास्तू: वास्तुनुसार घरात मंदिर कसे बांधावे
Read also : वारसा हक्क कायदा: वारस कोण आहे आणि वारसा काय आहे?
गृहमंदिर बांधताना, घरातील मंदिराची योग्य दिशा शोधणे महत्त्वाचे आहे. ते थेट जमिनीवर उभारु नका. त्याऐवजी ते थोड्या उंच असलेल्या व्यासपीठावर किंवा पायावर उभारा, असा श्री. परमार सल्ला देतात. “मंदिर संगमरवरी किंवा लाकडाचे बनलेले असावे. काच किंवा आक्रेलिकपासून बनविलेले मंदिर सहसा टाळा. मंदिरात पसारा होऊ देऊ नका. मंदिरात बसलेल्या वा उभ्या अवस्थेतील एकाच देवाच्या किंवा देवीच्या अनेक मूर्ती ठेवू नका. तसेच मंदिरात ठेवलेली मूर्ती किंवा फोटो खराब होऊ देऊ नये, कारण ते अशुभ मानले जाते,” असे श्री. परमार सूचित करतात. पूजा कक्ष वास्तूनुसार, घरात नऊ इंचांपेक्षा जास्त उंचीची देवाची किंवा देवीची मूर्ती नसावी. घरातील मंदिरात देवाचे युद्धाशी संबंधित फोटो ठेवणे, ज्यामध्ये देवाचे रूप कोपलेले असते, टाळा. सकारात्मक उर्जेसाठी देवाच्या मूर्ती नेहमी सौम्य, शांत आणि आशीर्वादित आसनात असुद्या.
मंदिर कोठेही असले तरी तेथे पूजा करण्यास जागा असावी. काही विशेष पूजे समयी संपूर्ण कुटुंब प्रार्थना करण्यासाठी एकत्र येते, त्यावेळी संपूर्ण कुटुंबास बसून प्रार्थना करण्यासाठी पुरेशी जागा आहे याची खात्री करुन घ्या. मंदिर क्षेत्रात उर्जेचा चांगला आणि निरोगी प्रवाह असावा म्हणून, ते नेहमी नीटनेटके व स्वच्छ ठेवावे. धूळ आणि जळमटे साचलेली नसावी आणि निरुपयोगी सामान मोकळ्या जागेत भरून ठेवू नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मंदिरामुळे आपल्याला निर्मळपणा आणि शांततेची भावना वाटली पाहिजे.
तुमच्याकडे डुप्लेक्स घर असल्यास, मंदिर तळमजल्यावर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. काही लोक हे मंदिर बेडरूममध्ये किंवा स्वयंपाकघरात ठेवतात. अशा वेळी तुम्ही मंदिर वापरत नसताना मंदिरासमोर पडदा लटकवा. तसेच स्वयंपाकघरात मंदिर ठेवताना त्याच्यासाठी ईशान्य कोपरा राखून ठेवावा. तसेच, मंदिराच्या मागे शौचालय असलेल्या भिंतीच्या विरुद्ध नसावे हे लक्षात ठेवा. तसेच वरच्या मजल्यावरील शौचालयाच्या खाली ठेवू नये. मंदिर कधीही तळघरात ठेवू नका, कारण ते अशुभ मानले जाते.
हे देखील पहा: घरात सकारात्मक उर्जेसाठी वास्तु टिप्स
पूर्वेकडे तोंड असलेल्या घरात मंदिर कोठे ठेवले पाहिजे?
वास्तू योजनेनुसार पूर्वाभिमुख घरातील पूजा कक्षाची रचना अशा प्रकारे केली पाहिजे की एखादी व्यक्ती प्रार्थना करताना वास्तूने शिफारस केलेल्या दिशांना तोंड होईल.
वास्तूनुसार, घरातील मंदिराची दिशा, पूर्वाभिमुख घरांमध्ये, पूजा कक्ष उत्तर किंवा पूर्व कोपऱ्यात असावा, जेणेकरून प्रार्थना करताना यापैकी कोणत्याही दिशेने तोंड असावे. पूर्वाभिमुख घरासाठी पूजा कक्ष वास्तु तत्त्वांनुसार, या दिशांना तोंड करून प्रार्थना करणे आदर्श मानले जाते आणि यामुळे घरात सकारात्मकता येते.
वास्तू योजनेनुसार तयार केलेल्या पूर्वाभिमुख घरामध्ये पूजा कक्षाचे नियोजन करताना, खोली बाथरूम किंवा जिन्याला लागून नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
उत्तरेकडे तोंड असलेल्या घरात पूजा कक्ष कोठे असावा?
घरात मंदिरासाठी आदर्श स्थान ईशान्य आहे. अशा वेळी प्रार्थना करतांना उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून उभे आहात याची खात्री करुन घ्या. पूजा कक्ष जिन्याखाली किंवा स्नानगृहलगतच्या भिंतीजवळ नाही याची दक्षता घ्या.
उत्तराभिमुख घरासाठी वास्तूनुसार पूजा कक्षाची रचना दिवाणखान्यासोबत करता येते. सामान्यतः, दिवाणखाना देखील पूर्व कोपऱ्यात असावा. अनेक मनोरंजक पूजा खोली डिझाइन आहेत. म्हणून, तुम्ही हॉलमध्ये खोलीचे विभाजन असलेल्या लहान पूजा कोपऱ्याची किंवा पूजा खोलीची योजना करा.
दक्षिणेकडे तोंड असलेल्या घरात पूजा कक्ष कोठे असावा?
घरातील मंदिराची दिशा कधीही दक्षिणेकडे असू नये, कारण त्या दिशेवर यम किंवा मृत्यूचा देव असतो. सकारात्मक ऊर्जेचा सतत प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या घरातील पूजा कक्षाचे छत त्रिकोणाच्या आकाराचे असावे.
पश्चिमेकडील तोंड असलेल्या घरात पूजा कक्ष कोठे आसावा?
पश्चिम दिशेने असलेल्या घरामध्ये, पूजा कक्ष घराच्या उत्तर-पूर्वेस असावा, कारण तो सर्वात शुभ कोपरा आहे. आपण जर पश्चिम दिशेला तोंड असणाऱ्या घरात रहात असाल तर आपल्यासाठी पाचही घटकांचे संतुलन राखणे महत्वाचे आहे.
पूजा खोलीत ठेवण्यासाठी ५ गोष्टी आणि डिझाइन टिप्स
वास्तूनुसार पूजा कक्षाची रचना करताना अनेक बाबी लक्षात घ्यायला हव्यात. त्यामध्ये पूजा खोलीचा आकार, वापरलेली सामग्री, छताची रचना, प्रकाशयोजना इत्यादींचा समावेश आहे. येथे काही उपयुक्त टिपा आहेत ज्या तुम्ही अनुसरण करू शकता:
मंदिर उंच जागेवर असले पाहिजे, ज्यामुळे मूर्तींचे पाय भक्ताच्या छातीच्या पातळीवर असावेत. कधीही मूर्ती जमिनीवर ठेवू नका. आदर्श मूर्ती १० इंचापेक्षा जास्त नसावी. मूर्ती दाटीवाटीने ठेवल्या जात नाहीत याची काळजी घ्या. गणपतीची मूर्ती देवी लक्ष्मीच्या डाव्या बाजूला ठेवावी. मूर्ती बसलेल्या स्थितीत असाव्यात आणि ‘चौरंगावर’ ठेवाव्यात. वास्तुनुसार मूर्ती एकमेकांकडे तोंड करून ठेवू नयेत.
आपण एखादे लाकडी मंदिर वापरत असाल तर, त्याच्या शीर्षस्थानी घुमट रचना करुन घ्या आणि पूजा कक्षात जाण्यासाठी एक उंबरठा असू द्या. एखाद्या मूर्तीची हानी झाल्यास त्यास पुनर्स्थापित करा आणि कधीही तुटलेल्या मूर्ती मंदिरात ठेवू नका.
वास्तुनुसार पूजा कक्षासाठी दोन झडपांचा दरवाजा योग्य आहे. अशा वेळी मूर्ती थेट दरवाजाकडे तोंड करून ठेवू नये.
हे देखील पहा: मुख्य दरवाजासाठी वास्तुशास्त्राच्या टिपा
- मंदिराच्या खोलीत दिवे/समई: पूजा कक्ष वास्तूनुसार, दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. पूजा करणार्या व्यक्तीच्या उजव्या बाजूला दिव्याची जागा असावी. जर कोणी दीर्घ कालावधीसाठी दिवा पेटवत असेल तर काचेने झाकलेला दिवा निवडणे अधिक सुरक्षित आहे. तुम्ही कापूर, दिवा किंवा अगरबत्ती लावताना अग्निसुरक्षा खबरदारीचा विचार करा. वास्तूनुसार, दिवा कधीही दक्षिणेकडे ठेवू नका, कारण त्यमुळे संपत्तीचा निचरा होतो असे म्हटले जाते. नेहमी दिव्यांच्या आत कापसाच्या वाती वापरा.
- पूजा कक्षातील फुले: पूजा कक्षात नेहमीच ताजी फुलं वापरा. शिळी फुले वापरू नये. वास्तुनुसार, मंदिरातून संध्याकाळी उशिरा फुले जेव्हा जेव्हा ती सुकतात आणि कोमेजतात तेव्हा ती काढून टाकावीत.
- मुर्त्त्या, छायाचित्रे आणि चित्रे: मंदिराच्या वास्तूच्या दिशेनुसार मुर्त्या, पुतळे आणि देवाची चित्रे ठेवा. पूजा कक्षात स्वतःचे फोटो लावू नका. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे/पूर्वजांचे निधन झालेले फोटो देखील टाळले पाहिजेत. यामुळे घरातील ऊर्जेमध्ये असंतुलन होते.
- अगरबत्ती: वास्तुशास्त्रानुसार, पूजा खोलीत अगरबत्ती लावल्याने शांत वातावरण निर्माण होते आणि उर्जेचा सकारात्मक प्रवाह सुनिश्चित होतो.
- पवित्र ग्रंथ: पवित्र ग्रंथ आणि धर्मग्रंथ पश्चिम आणि दक्षिण भिंतीवर ठेवा. मंदिर परिसरात केवळ तीच पवित्र पुस्तके ठेवली जातील याची खात्री करा जी नियमितपणे वाचली जातात. फाटलेली पुस्तके अजिबात ठेवू नका.
घरासाठी चांगले नशीब कसे आकर्षित करावे?
तुमच्या पूजेच्या खोलीचे डिझाईन चांगल्या नाशिबासाठी पूजा रूम बांधले आहे या गोष्टींसह पूर्ण झाले आहे. वास्तुशास्त्र आणि फेंगशुई तज्ञांच्या मते, पूजा खोलीची व्यवस्था आणि या शुभ वस्तू ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होईल.
मंदिरासाठी कोणती दिशा उत्तम आहे हे कळल्यावर तुम्ही कंपास वापरू शकता आणि वेगवेगळ्या दिशा ओळखण्यासाठी घराच्या मध्यभागी उभे राहू शकता. घराचे प्रवेशद्वार हे ठिकाण आहे जिथून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. वास्तूनुसार घराचा दरवाजा नैऋत्य दिशेला नसावा कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव येऊ शकते. या दोषावर एक वास्तू उपाय म्हणजे दाराबाहेरील टाइल्सवर भगवान हनुमानाच्या दोन प्रतिमा लावणे.
सकारात्मकता आणि चांगल्या उर्जेचा प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी, तुमची घर योजना वास्तू अनुरूप असणे आवश्यक आहे. स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात असावे. उत्तर किंवा ईशान्य दिशेला स्वयंपाकघर बांधणे टाळा जी वास्तूनुसार मंदिर किंवा पूजा खोलीसाठी सर्वोत्तम दिशा आहे. त्याचप्रमाणे, या दिशेला स्नानगृह डिझाइन करणे टाळले पाहिजे ज्यामुळे अन्यथा आरोग्य आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात.
तुमच्या पूजेच्या खोलीचा कोपरा, म्हणजे उत्तर आणि ईशान्य दिशा, कोणत्याही जड वस्तूंपासून मुक्त असल्याची खात्री करा कारण ते घरातील पैशाचा प्रवाह रोखू शकतात.
पूजा कक्षातील साठवणूक
पूजा कक्षात आपण ज्या वस्तूंचा वापर करू इच्छित नाही अशा गोष्टी ठेवण्याचे टाळा. पूजेच्या खोलीत धूप, पूजेचे साहित्य, फुले, दिवे आणि पवित्र पुस्तकांसह ५ वस्तू ठेवण्यासाठी मंदिराजवळ एक लहान शेल्फ तयार करा. या भागात मंदिराच्या खाली किंवा निर्माल्यपेटीच्या खाली अनावश्यक वस्तू ठेवण्याचे टाळा. मूर्तींच्या वर काहीही ठेवू नका. पाण्यासाठी फक्त तांब्याची भांडी वापरा आणि कलशातील पाणी रोज बदलत राहा.
पूजा कक्षात वापरण्यायोग्य रंग
मंदिराच्या परिसरात पांढरा, बेज, लैव्हेंडर किंवा हलका पिवळा रंग वापरा. गडद तपकिरी आणि काळा रंग काटेकोरपणे टाळा.
कक्ष वास्तु: वातावरण
ताज्या फुलांनी मंदिर सजवा. सौभाग्य आणि सकारात्मकतेसाठी घराच्या पूजा कक्षात काही आवश्यक गोष्टी ठेवाव्यात. परिसर स्वच्छ करण्यासाठी आणि दैवी वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्ही काही सुगंधी मेणबत्त्या, धूप किंवा अगरबत्ती लावू शकता. लक्षात ठेवा की अशा जागेत स्वच्छता सर्वात महत्वाची आहे. मंदिरातील फोटो किंवा इतर मूर्तींच्या खाली लाल रंगाचे कापड ठेवावे. मंदिर वास्तुनुसार घंटा वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते. घरातील मंदिरांमध्ये, डाव्या बाजूला घंटा ठेवावी. जमिनीवर रांगोळी बनवून सजवा कारण त्या सकारात्मक वातावरण आणतात आणि आनंद देतात. वास्तुनुसार, समृद्धी आणते म्हणून ईशान्य भिंतीवर स्वस्तिक आणि ओम चिन्ह काढा. जमिनीवरील रांगोळीमध्ये कोणतेही शुभ चिन्ह बनवू नका. जर मंदिराच्या परिसरात कमी जागा असेल तर ‘चौरंगावर’ रांगोळी बनवू शकतात आणि तो मंदिराच्या जवळ ठेवू शकतात.
पूजा कक्ष वास्तू: घराच्या मंदिराची भिंत आणि छत कशी सजवायची
मंदिराच्या वरची छत पीओपी डिझाइनने सजविली जाऊ शकते. मंदिराच्या जागेत खोली आणण्यासाठी लटकती झुंबर वापरून प्रकाश सावल्या आणि डिझाइन यांना हायलाइट करू शकतो. छताला सोन्याचे टेक्सचर पेंट आणि टांगणाऱ्या घंटांनी सुशोभित केले जाऊ शकते. जागा असल्यास, मंदिर ज्या भिंतीवर निश्चित केले आहे ती सजवा. बॅकलिट पॅनल्सचे सध्या चलन आहे. दिव्य आभा वाढवण्यासाठी बॅकलिट बोर्डवर संस्कृत श्लोक किंवा कमळाचा एखादा प्रकार कोरला जाऊ शकतो. दुसरा पर्याय म्हणजे भिंतीची रचना आकर्षक वॉलपेपरसह शुभ असणाऱ्या पिवळ्या किंवा केशरी रंगात करणे.
पूजा कक्षात अशुद्ध वस्तू टाळा
वर नमूद केलेल्या काही गोष्टी व्यतिरिक्त, चाम्बडे ही आणखी एक वस्तू आहे जी अपवित्र मानली जाते. मंदिराच्या जागेत प्राण्याची कातडी ठेवू नये. तसेच, पूजा कक्षात पैसे ठेवणे टाळा. ते अशुद्ध नसले तरी आपल्याला ज्या ठिकाणी शांती आणि आशीर्वाद मिळतात अशा ठिकाणी पैसे वाचवणे / साठवणे योग्य मानले जात नाही.
हे देखील पहा: बांबू वनस्पती ठेवण्यासाठी वास्तुशास्त्र टिपा
Read also : कल्याण लक्ष्मी योजना तपशील, अर्ज आणि पात्रता
घरातील मंदिराची दिशा: घरात मंदिराची स्थापना करताना लक्षात ठेवण्याचे मुद्दे
हे जाणून घ्या | हे टाळा |
ईशान्य दिशा सर्वोत्तम दिशा आहे | पूजा कक्ष पायर्याखाली नसावे. |
प्रार्थना करताना उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करा | पूजा कक्ष बाथरूमच्या समोर असू नये |
तळ मजला सर्वोत्तम स्थान आहे | मूर्ती एकमेकांच्या समोर ठेवू नयेत |
दरवाजे, खिडक्या उत्तर किंवा पूर्वेस उघडल्या पाहिजेत | बहुउद्देशीय खोली म्हणून त्याचा वापर करू नका |
तांब्याचे भांडे चांगले आहेत | मृतांची छायाचित्रे ठेवू नका |
हलके आणि सुखदायक रंग वापरा | आपल्या बेडरूममध्ये मंदिर ठेवणे टाळा |
प्रार्थना करताना नेहमी चौरंग, चटई किंवा गालिचा वापरा. |
जर आपण एखाद्या लहान इमारतीत रहात असाल किंवा घरातील मंदिरासाठी मालमत्तेचा आराखडा वास्तु-अनुपालन करण्यास शक्य नसेल तर पुढील पर्याय निवडा ज्याचा उत्तम उपयोग केला जाऊ शकेल. ईशान्य दिशा आपल्या घराच्या मंदिरासाठी उत्तम दिशा आहे कारण याबाजूने नैसर्गिक प्रकाश मिळतो. जेव्हा ती जागा विना खिडकी असते. नैसर्गिक प्रकाशाच्या अनुपस्थितीत, पूजा कक्षाच्या वास्तूनुसार, तुम्ही पूजा खोलीला कृत्रिम प्रकाशाने देखील प्रकाशित करू शकता, विशेषत: जेव्हा खिडक्या नसलेली जागा असेल.
वास्तुनुसार पूजा कक्षासाठी सर्वोत्तम रंग
आधीच नमूद केल्याप्रमाणे, पूजा खोलीची शांतता राखण्यासाठी, मंदिर वास्तुशास्त्र असे म्हणते की हलके रंग श्रेयस्कर असतात. पांढरे, हलके निळे आणि फिकट गुलाबी पिवळे रंग हे योग्य आहेत. पूजा कक्षात प्रार्थना कक्षासाठी योग्य असे शांततेची भावना न देणारे गडद रंग टाळा. मंदिराच्या परिसरात कधीही काळा रंग वापरू नका, कारण मंदिर वास्तूमध्ये याला सक्त मनाई आहे. त्याचप्रमाणे, आपल्या पूजेच्या खोलीत पांढरे संगमरवर किंवा फिकट रंगाच्या संगमरवरच्या टाईल वापरा.
हे देखील पहा: वास्तुवर आधारित आपल्या घरासाठी योग्य रंग कसे निवडावेत
घरातील देवळात देवाच्या मूर्ती ठेवू नयेत
नटराज हे भगवान शिवाचे रुद्र रूप आहे, हे भगवान शंकराचा क्रोधित अवतार आहे. त्यामुळे नटराज घरात ठेवू नये कारण त्यामुळे घरात अशांतता निर्माण होऊ शकते. मंदिरात दोन शिवलिंग कधीही ठेवू नका.
घरातील मंदिरात शनिदेवाची मूर्ती ठेवणे टाळावे. त्याची पूजा घराबाहेरील मंदिरातच करावी. राहु-केतूची मूर्ती घरात ठेवणे अशुभ मानले जाते.
पूजा थाळीचे सामान
मंदिरात ठेवलेली पूजा थाली पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश या पाच वैश्विक घटकांचे प्रतिनिधित्व करते पूजा थाली वापरणे हा दैवी शक्तींची उपासना करण्याचा एक मार्ग आहे. पूजा थाळी चांदी, पितळ, तांबे, मीनाकारी अलंकार किंवा अगदी स्टीलची असू शकते. तांदूळ कुमकुम, हळद (पावडर किंवा पूर्ण तुकडे) दिवा आणि फुले नेहमी ठेवा. चंदनाची पेस्ट, सुपारीची पाने किंवा सुपारी, कलश आणि प्रसाद हे शक्य असल्यास वेगळे ठेवू शकता.
हे देखील पहा: बेडरूमसाठी वास्तु टिपा
घरातील मंदिराची उंची किती असावी?
घराच्या मंदिराच्या योग्य दिशेबरोबरच, मंदिर जमिनीपासून काही फूट उंच ठेवावे जेणेकरुन ठेवलेल्या मूर्ती भक्ताच्या छातीच्या पातळीवर असाव्यात. देवतांना अशा उंचीवर ठेवा जेथे कोणी बसून किंवा उभे राहून आरामात प्रार्थना करू शकेल. फरशी आणि मंदिराच्या पायथ्यामधील उंची अंदाजे ३२-३६ इंच दरम्यान असावी.
पूजा कक्ष वास्तू: घरातील मंदिर स्वच्छ करण्यासाठी टिपा
घरातील स्वच्छ मंदिर सकारात्मक आभा देते आणि देवी लक्ष्मीला आपल्या घरी आमंत्रित करते.
पितळेच्या मूर्ती आणि कलश कोमट पाण्यात डिटर्जंटने भिजवावेत. नंतर त्यावर लिंबू घासून घ्या. लिंबाचा तुकडा सोबत थोडासा बेकिंग सोडा देखील वापरू शकता.
तांब्याची भांडी व्हिनेगर आणि मीठ वापरून स्वच्छ करता येतात.
दररोज धुवून दिवे स्वच्छ ठेवा, डिशवॉशिंग लिक्विड वापरून स्क्रब करून ग्रीस काढून टाका. पितळी दिवे स्वच्छ करण्यासाठी चिंचेचे पाणी किंवा व्हिनेगर वापरा.
चांदीच्या मूर्ती चमकतील राहिल याची खात्री करण्यासाठी टूथपेस्ट वापरा आणि टूथब्रशने हळूवारपणे घासून काढा. पाणी उकळवा आणि चांदीची भांडी भिजवा. नंतर उकळत्या पाण्यात अॅल्युमिनियम फॉइलचे तुकडे आणि एक चमचा बेकिंग सोडा घाला. ५ मिनिटांनी चांदीची भांडी काढा. ते स्वच्छ धुवा आणि वाळवा.
संगमरवरी मंदिर सौम्य डिटर्जंट टाकलेल्या कोमट पाण्याने हलक्या हाताने पुसून घ्या आणि नंतर कोरड्या कापडाने कोरडे करा.
फोटोंची काचेची फ्रेम कोणत्याही ग्लास क्लीनिंग स्प्रे आणि मऊ कापडाने स्वच्छ केली जाऊ शकते.
लाकडी मंदिरातील धूळ कापडाने झटकून घालवता येते.
सामान्य प्रश्न (FAQs)
आपण दिवाणखान्यात मंदिर ठेवू शकतो?
एखाद्याला मंदिरासाठी संपूर्ण कक्ष उपलब्ध नसल्यास, पूर्वेकडील भिंतीवर एक छोटी वेदी बसविली जाऊ शकते.
आपण शयनकक्षामध्ये किंवा स्वयंपाकघरात मंदिर ठेवू शकतो?
असे मंदिर वापरत नसताना मंदिरासमोर पडदा लटकवा.
आपण मंदिरात शंख ठेवू शकतो का?
घरात मंदिरात शंख ठेवणे शुभ मानले जाते. शंख वाजवण्याचा आवाज संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा आणतो.
मंदिरात दिवा पेटवण्यासाठी कोणते तेल वापरावे?
वास्तुनुसार गाईचे तूप उत्तम आहे. सकारात्मक ऊर्जेसाठी घरी दिवा लावण्यासाठी तीळाचे तेल किंवा मोहरीचे तेल देखील वापरता येते.
मंदिरात ठेवलेल्या कलशात पाणी भरून काय करावे?
मंदिरात ठेवलेल्या कलशातील पाणी रोज बदलावे. सकाळी ते तुळशीला किंवा इतर कोणत्याही रोपाला अर्पण करावे.
मी मंदिराच्या खोलीत मोराची पिसे ठेवू शकतो का?
मंदिरात किंवा पूजा कक्षात मोराची पाच पिसे ठेवता येतात. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होईल आणि वास्तू दोष दूर होण्यासही मदत होईल.
पूजेत सुपारीची पाने किंवा सुपारी का वापरतात?
सुपारीची पाने शुभ मानली जातात आणि ती समृद्धी दर्शवतात आणि पूजाविधींमध्ये वापरली जातात. सुपारी हा अहंकार दर्शवितो ज्याला देवाच्या वेदीवर शरण जाणे आवश्यक आहे आणि व्यक्ती नम्र असणे आवश्यक आहे. असे म्हटले जाते की सुपारी घरात शांतता आणि सौहार्द राखण्यास मदत करते.
घरात मंदिरातील पूजेच्या थाळीत तांदूळ का ठेवला जातो?
पूजा थाळीत ठेवलेल्या तांदळाला ‘अक्षता’ असे म्हणतात जे अखंड पांढरे तांदूळ असतात आणि घरात नेहमी कुन्कुवासोबत ठेवतात. तांदूळ शुभ, समृद्धी आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक आहे. तसेच ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते.
(स्नेहा शेरॉन मॅमेन आणि हरिणी बालसुब्रमण्यम कडून आलेल्या माहितीसह)
Source: https://ecis2016.org/.
Copyright belongs to: ecis2016.org
Source: https://ecis2016.org
Category: Marathi